उत्तराखंडमधील हरिद्वारच्या धार्मिक स्थळांसमवेत ६ रेल्वेस्थानकांना बाँबने उडवण्याची ‘जैश-ए-महंमद’ची धमकी !
देहराडून (उत्तराखंड) – राज्यातील रुडकी रेल्वेस्थानकाच्या अधीक्षकांना धमकीचे पत्र मिळाले असून त्यामध्ये ‘२१ मेनंतर हरिद्वार येथील मंशादेवी आणि चंडीदेवी यांच्यासमवेत अन्य धार्मिक स्थळे, तसेच लक्सर, नजीबाबाद, देहराडून, रुडकी, ऋषिकेश आणि हरिद्वार येथील रेल्वेस्थानके यांवर बाँबद्वारे आक्रमण करण्यात येईल’, अशी धमकी देण्यात आली आहे. पत्र पाठवणार्याने स्वत:ला सलीम अन्सारी म्हटले असून ‘जैश-ए-महंमद’ या जिहादी आतंकवादी संघटनेचा तो ‘एरिया कमांडर’ असल्याचे त्याने नमूद केले आहे.
Roorkee Railway Station Superintendent received a letter on the evening of May 7, threatening to blow up six railway stations in Uttarakhand.Sender of the letter described himself as the area commander of the terrorist organization Jaish-e-Mohammed (JeM).#Threat #JeM #railways pic.twitter.com/ocfbU93j8s
— Ritam | ऋतम् (@TheRitamApp) May 9, 2022
पत्रामध्ये ‘उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनाही लक्ष्य केले जाऊ शकते’, असा उल्लेख असल्याचे म्हटले जात आहे. या पार्श्वभूमीवर उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश येथील रेल्वेस्थानकांवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचे अन्वेषण करत आहेत.
Uttarakhand: Jaish-e-Mohammed threatens to blow up railway stations and religious places with bombs, CM’s name also included
Read: https://t.co/KeA6OGDN2n#uttarakhand #pushkarsinghdhami #cmdhami #latestnews @uttarakhandcops #haridwar#CharDham #Tourism #Threatening pic.twitter.com/0aqjPX5vvh— Nation One (@Nationonetv) May 9, 2022
संपादकीय भूमिकाहिंदूंची धार्मिक स्थळे ही नेहमीच आतंकवादी संघटनांची लक्ष्य राहिली आहेत. हे उघड सत्य असतांना ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणे ही शुद्ध थाप आहे, हे लक्षात घ्या ! |