युक्रेनमध्ये केलेली कारवाई पाश्चात्त्य देशांना दिलेले योग्य उत्तर ! – पुतिन
मॉस्को (रशिया) – रशियाने युक्रेनमध्ये केलेली सैनिकी कारवाई म्हणजे पाश्चात्त्य देशांच्या धोरणांना योग्य वेळी दिलेले योग्य उत्तर आहे. रशिया युक्रेनमधील मातृभूमीचे रक्षण करत आहे. जगामध्ये दुसरे युद्ध होऊ नये, हे आमचे दायित्व आहे आणि त्यासाठी आम्ही काहीही करू शकतो, असे प्रतिपादन रशियाचे राष्ट्रपती व्लादिमिर पुतिन यांनी रशियाच्या ७७ व्या विजयदिनानिमित्तच्या कार्यक्रमात केले.
#Russia was facing ‘absolutely unacceptable threat’ in #Ukraine – #Putin in V-Day #speech pic.twitter.com/7xyxh4DEIR
— Bishnu Maharaj (@bishnu_maharaj) May 9, 2022
पुतिन म्हणाले की, नाटो (नॉर्थ अॅटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन) आमच्या सीमेवर रशियासाठी संकट निर्माण करत आहे. युक्रेनमध्ये आमचे सैन्य संकटांचा सामना करत आहे. आम्ही आमच्या भूमीसाठी युद्ध लढत आहोत. युक्रेन अण्वस्त्रांकडे वळत आहे. आम्हीही पण केला आहे की, ज्याप्रमाणे हिटलरला हरवले, तसेच युक्रेनलाही हरवू. यात आमचाच विजय होईल.