तमिळनाडूतील एका भागात हिंदूंनी धर्मांतर करण्यास नकार दिल्याने चर्चकडून मार्गावर भिंत उभारण्याचा प्रयत्न
चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडू राज्यातील तिरुवन्नामलाईमधील मारुथुवमपडी गावामध्ये रोमन कॅथॉलिक चर्चने गावकर्यांना धर्मांतर करण्यास सांगितले होते; मात्र त्यांनी याला नकार दिल्याने चर्चकडून रस्ता रोखण्यासाठी भिंत बांधण्याचा प्रकार घडला आहे. या रस्त्यामुळे गावकरी मुख्य रस्त्यावर पोचू शकत होते. या प्रकरणी गावकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे ‘चर्चवर कारवाई करावी’, अशी मागणी केली आहे. तसेच या चर्चकडून चालवण्यात येणार्या शाळेने गावकर्यांच्या मुलांना शिकवण्यासही नकार दिला. या गावात अनुमाने ३ सहस्र हिंदू रहातात. चर्चकडून चालवण्यात येणार्या शाळेचे व्यवस्थापन पहाणारा फादर येसुपदम याच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकर्यांनी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
Tamil Nadu: Church blocks access to public road for Hindus, denies education to children for refusing to convert https://t.co/j4zquayfPA
— OpIndia.com (@OpIndia_com) May 8, 2022
संपादकीय भूमिकातमिळनाडूमध्ये द्रमुकचे सरकार आल्यापासून हिंदूंवरील अत्याचार आणि आघात यांत वाढ होऊन ख्रिस्ती मिशनर्यांना चेव चढला आहे. अशा घटनांची नोंद राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना का घेत नाहीत ? अशी कृती हिंदूंनी केली असती, तर एव्हाना ही आंतरराष्ट्रीय बातमी झाली असती ! (द्रमुक : द्रविड मुन्नेत्र कळघम् – द्रविड प्रगती संघ) |