माहीम दर्ग्याच्या विश्वस्तांसह मुंबईतील २९ ठिकाणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या धाडी !
दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचा संशय
मुंबई – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याच्या संशयावरून माहीम दर्ग्याच्या विश्वस्तांसह मुंबईतील २९ ठिकाणी धाडी टाकल्या. नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडीबाजार आदी ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या.
मुंबई में दाऊद के सहयोगियों पर NIA की रेड, 20 से ज्यादा ठिकानों पर छापेमारी: माहिम और हाजी अली दरगाह के ट्रस्टी सोहेल समेत 3 हिरासत में#Mumbai #NIA https://t.co/c5jYmxe4dg
— ऑपइंडिया (@OpIndia_in) May 9, 2022
माहीम भागात ४ ठिकाणी टाकलेल्या धाडींत माहीम दर्ग्याचेे विश्वस्त सोहेल खंडवानी याच्या मालमत्तेचाही समावेश आहे. पायधुनी भागातही ७१ वर्षीय व्यक्तीच्या मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या. ही व्यक्ती ‘दाऊद ट्रस्ट’ नावाची संस्था चालवत असल्याची माहिती आहे.
सोहेल खंडवानी हा याकूब मेमन याचा साथीदार होता. याकूब मेमन हा मुंबईतील वर्ष १९९३ च्या साखळी बाँबस्फोट प्रकरणातील प्रमुख आरोपी टायगर मेमन याचा भाऊ होता. त्याला वर्ष २०१५ मध्ये फाशीची शिक्षा देण्यात आली. अन्वेषण यंत्रणेने यापूर्वी सोहेल खंडवानी याच्याकडून लाखो रुपये कह्यात घेतले होते.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून ३ जण कह्यात !
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्यांनी सोहेल खंडवानी, तसेच ग्रँट रोड भागातून छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूट या दोघांना चौकशीसाठी कह्यात घेतले आहे. व्यावसायिक समीर हिंगोरा यालाही कह्यात घेण्यात आले आहे.