पैडिमादुगू (तेलंगाणा) येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भाग्यनगर (तेलंगाणा) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोरुटला जिल्ह्यातील पैडिमादुगू येथे नुकतीच हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आली. या सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान गाव असतांनाही ३०० हून अधिक धर्मप्रेमी नागरिक या धर्मसभेसाठी एकवटले होते. या सभेला श्री श्री श्री नम्भी कौशिक वेणुगोपाल स्वामी यांनी संबोधित केले. सनातन संस्थेच्या सौ. विनुता शेट्टी यांनी ‘जीवनात धर्माचरणाचे महत्त्व’, तर हिंदु जनजागृती समितीचे तेलंगाणा आणि आंध्रप्रदेश समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
काही दिवसांपूर्वी कोरुटला येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा घेण्यात आली होती. त्या सभेनंतर घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये पैडिमादुगू गावातील श्री लक्ष्मी वेंकटेश्वरा स्वामी देवालयाचे अध्यक्ष पिद्दी गंगा रेड्डी उपस्थित होते. तेव्हा त्यांनी समितीला त्यांच्या गावातही धर्मसभा घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार पैडिमादुगूमध्ये या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
क्षणचित्र : सभेपूर्वी आयोजित वाहनफेरीला २८ किलोमीटर लांबून शहरातूनही धर्मप्रेमी नागरिक उपस्थित होते.