मशिदींवरील भोंगे न काढल्यास पोलीस ठाण्यासमोर हनुमान चालिसा लावू !

मनसेची पोलिसांना चेतावणी

पुणे – सर्वोेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे शहरातील अंदाजित ४५० मशिदींवरील अनधिकृत भोंगे उतरवण्यासाठी पोलिसांनी कारवाई करावी, अन्यथा पोलीस ठाण्यासमोर हनुमान चालिसा म्हणत आंदोलन करू, अशी चेतावणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पोलिसांना निवेदनाद्वारे दिली आहे.

या निवेदनामध्ये म्हटले आहे कि, अजानला आमचा विरोध नाही; परंतु भोंग्याद्वारे अजान नको. भोंगे हा सामाजिक विषय आहे. मशिदींच्या जवळ रहाणाऱ्या नागरिकांना यामुळे नाहक त्रास होतो. याची नोंद घेऊन सर्वोच्च न्यायालयाने त्याविषयीचे आदेश दिलेले आहेत. त्याची कार्यवाही पोलिसांनी करावी, अशी आमची भूमिका आहे.

या निवेदनावर मनसेचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते हेमंत संभूस, शहराध्यक्ष साईनाथ बाबर, प्रदेश उपाध्यक्ष रणजित शिरोळे, बाळा शेंडगे, सरचिटणीस अजय शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.