भंडारा कारागृहात अधिक भाजी न दिल्याने धर्मांध बंदीवानाची हिंदूला मारहाण !
भंडारा – जिल्हा कारागृहात सकाळी जेवणाचे वाटप चालू असतांना एका धर्मांध बंदीवानाने प्रमाणापेक्षा अधिक भाजी मागितली. त्याने भाजी न देणाऱ्यास मारहाण केली. नंतर ४ बंदीवानांनी दुसऱ्या बंदीवानाला मारहाण केली. ही घटना ६ मे या दिवशी घडली. शेख रफिक शेख रहेमान, महेश आगाशे, मोहम्मद अफरोज शेख, राहुल पडोळे अशी आरोपींची नावे आहेत. हे बंदीवान तुमसर येथील बहुचर्चित सोनी हत्याकांडातील आरोपी असून १ जण दुसऱ्या प्रकरणातील आरोपी आहे. घटनेच्या दिवशी सकाळी १०.३० वाजता देवेंद्र राऊत हे बॅरेक उत्तरदायी म्हणून भोजनाचे वाटप करत होते. या वेळी शेख रफिक शेख रहेमान याने अधिक भाजी मागितली; पण राऊत यांनी ती देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त शेख याने राऊत याला मारहाण करायला प्रारंभ केला. या झटापटीत राऊत खाली पडले.
संपादकीय भूमिकाकारागृहातील आरोपी असूनही उद्दामपणा न सोडणारे धर्मांध ! |