सांगलीतील २९१ मशिदींनी ध्वनीवर्धकाच्या अनुमतीसाठी अर्ज केला नाही !
सांगली – मशिदींवरील अनधिकृत ध्वनीवर्धक उतरवण्यासाठी मनसेच्या आंदोलनानंतर येथील ४९५ मधील २९१ मशिदींनी अनुमतीसाठी अर्ज केलेला नाही. २०४ मशिदींनीच ध्वनीवर्धक वापरण्याच्या अनुमतीसाठी अर्ज केले आहेत. २७ मशिदींना न्यायालयीन आदेशानुसार ध्वनीवर्धकास परवानगी दिल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सांगितले. अर्ज केलेल्या मशिदींमधील १७७ अर्ज अद्याप काही त्रुटींमुळे प्रलंबित आहेत, तर २९१ मशिदींनी अर्ज केलेला नाही.