नवी मुंबईत क्रिकेटच्या १३ सट्टेबाजांना अटक !
नवी मुंबई – येथील एपीएम्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईदीप लॉजवर धाड टाकून ५ सट्टेबाजांना, तर मैदानात बसून क्रिकेटवर सट्टेबाजी करणाऱ्या ८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे; पण या वेळी काही जण तेथून पळून गेले. त्यांच्याकडून ७ लाखांचा मुद्देमाल आणि १० ते १२ भ्रमणभाष, तसेच डोंगल जप्त करण्यात आले आहेत. हे सट्टेबाज ‘ऑनलाईन’ सामना पाहून चौकार, षट्कार, तसेच विकेट यांवर सट्टा लावत होते.