अमरावती येथे आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीला माहेरच्यांनी फरफटत नेले !
अमरावती – जिल्ह्यातील अंबाडा गावातील २२ वर्षीय युवकाने तालुक्यातील १९ वर्षीय युवतीसमवेत २८ एप्रिल या दिवशी आंतरजातीय प्रेमविवाह केला; मात्र मुलीच्या घरच्यांना हा विवाह मान्य नव्हता. ४ मे या दिवशी मुलीच्या माहेरच्या नातेवाइकांनी येऊन तिला आमच्या घरातून फरफटत नेले, असा आरोप करून पतीने मोर्शी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. पोलिसांनी या प्रकाराची गांभीर्याने नोंद घेऊन विवाहित महिलेच्या कुटुंबियांची चौकशी चालू आहे, तर मुलीचा शोध घेण्यात येत आहे.