स्वयंसूचनासत्र करण्यापूर्वी ५ मिनिटे नामजप करणे, प्रार्थना, कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक !

सौ. कोमल जोशी

‘चित्तामध्ये स्वयंसूचना ग्रहण होण्यासाठी सूचनेभोवती चैतन्याचे वलय असणे, म्हणजे नुसते शब्द नको, तर भावाचे आलंबन करून चित्तामध्ये तात्पुरते चैतन्य निर्माण करणे आवश्यक आहे. असे केले, तरच ती सूचना आवश्यक त्या ठिकाणी जाऊन अपेक्षित परिणाम होतो; कारण कलियुगामध्ये चित्ताभोवती अनिष्ट शक्तींनी निर्माण केलेल्या त्रासदायक आवरणामुळे सूचना अंतर्मनात जाणे अशक्य होते. नामजप, प्रार्थना आणि कृतज्ञता यांमुळे हे आवरण नष्ट होते; म्हणून स्वयंसूचनासत्र करण्यापूर्वी ५ मिनिटे नामजप करणे, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे.’

– सौ. कोमल जोशी (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (२४.२.२०१०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.