पालखीचा पायी मार्ग आणि तळ यांची जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्याकडून पहाणी
पुणे – कोरोनाकाळातील दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पायी पालखी मार्गावरील विविध पालखी तळांची प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पहाणी केली. या पहाणीमध्ये आढळून आलेल्या त्रुटींवर त्वरित कार्यवाही करण्याचे आदेशही त्यांनी जारी केले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे पालखी सोहळ्याविषयी आयोजित प्राथमिक आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते.
डॉ. देशमुख म्हणाले की, पालखी तळ आणि विसाव्याच्या ठिकाणी आरोग्य सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय आणि स्वच्छतेविषयी आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. पालखी महामार्गाची कामे चालू असल्याने वाटेत अडथळा येणार नाही, याची दक्षता घेऊन संबंधित विभागांनी आवश्यक ती कामे तातडीने पूर्ण करावीत.