साधकांनो, दास्यभावाचे प्रतीक असलेल्या रामभक्त हनुमानाप्रमाणे अंतरात सेवकभाव निर्माण करून स्वतःतील अहंचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न करा !
‘अध्यात्मात सेवकभावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हनुमानाने युगानुयुगे दास्यभक्तीचा सर्वाेत्कृष्ट आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. तो आपल्या प्रभूकरता (श्रीरामाकरता) प्राण अर्पण करण्यासाठी सदैव सिद्ध असायचा. श्रीरामाच्या सेवेपुढे त्याला सर्वकाही कवडीमोल वाटायचे.
सर्व साधकांनी स्वतःत हनुमानाप्रमाणे सेवकभाव (दास्यभाव) निर्माण होण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे त्यांच्यात नम्रता, लीनता, गुरुनिष्ठा, गुरूंचे मन जिंकण्याची आंतरिक तळमळ आदी गुण वृद्धींगत होऊन अहंचे निर्मूलन होऊ लागेल आणि साधकांसाठी ईश्वरप्राप्तीचा मार्ग सुकर होईल !
साधकहो, प्रभु श्रीरामचंद्रांच्या रामराज्य स्थापनेच्या कार्याशी पूर्णतः एकरूप झालेल्या हनुमंताचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवा आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात स्वतःला समर्पित करा !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.५.२०२२)