मी स्वत: हिंदु जनजागृती समितीच्या निवेदनाचा पाठपुरावा करीन ! – डॉ. अर्चना पाटील, अपर तहसीलदार, सांगली

‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यास प्रतिबंध आणण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे सांगली, पलूस, विटा, शिरोळ येथे निवेदन

सांगली अपर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील (उजवीकडे) यांना निवेदन देतांना श्रीमती मधुरा तोफखाने आणि धर्मप्रेमी सौ. अमृता इंदोलीकर

सांगली, ८ मे (वार्ता.) – शाळांमधून बायबल शिकवत असतील, तर ती चुकीची गोष्ट असून मी स्वत: या निवेदनाचा पाठपुरावा करीन, असे आश्वासन सांगली येथील अपर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांनी दिले. कर्नाटकातील ‘क्लॅरेन्स हायस्कूल’ या ‘कॉन्व्हेंट’ शाळेत मुलांना बायबल शिकणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर देशभरातील ‘कॉन्व्हेंट शाळां’मध्ये हिंदु विद्यार्थ्यांना बायबल शिकण्याची सक्ती करण्यावर प्रतिबंध आणावा, या मागणीचे केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली येथे ६ मे या दिवशी अपर तहसीलदार डॉ. अर्चना पाटील यांना देण्यात आले. त्या वेळी त्यांनी वरील मत व्यक्त केले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या श्रीमती मधुरा तोफखाने, धर्मप्रेमी सौ. अमृता इंदोलीकर या उपस्थित होत्या.

पलूस येथे तहसीलदार निवास ढाणे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. भीमराव खोत, तसेच अन्य धर्मप्रेमी

१. पलूस येथे तहसीलदार निवास ढाणे यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. भीमराव खोत, धर्मप्रेमी सर्वश्री शरद पाटील, गणेश बुचडे, अक्षय साळुंखे उपस्थित होते.

विटा येथे नायब तहसीलदार संतोष बुटे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्या

२. विटा येथे नायब तहसीलदार संतोष बुटे यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या सौ. जयश्री वेदपाठक, सौ. अलका रोकडे आणि सौ. पद्मा चोथे उपस्थित होत्या.

शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथे निवासी नायब तहसीलदार योगेश जमदाडे (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. संजय घाटगे आणि श्री. अण्णासाहेब वरेकर

३. शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) येथे निवासी नायब तहसीलदार योगेश जमदाडे यांना निवेदन देण्यात आले. निवेदन स्वीकारल्यावर तहसीलदार जमदाडे म्हणाले, ‘‘मी सर्व धर्मांचा अभ्यास करतो. मूळ धर्माच्या शिकवणीचा अन्वयार्थ त्यांचे अनुयायी चुकीचा लावतात.’’ या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे आणि श्री. अण्णासाहेब वरेकर उपस्थित होते.