पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया धोकादायक संघटना ! – तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि

चेन्नई (तमिळनाडू) – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय) ही एक धोकादायक संघटना आहे. तिच्यापासून सावध रहाण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन तमिळनाडूचे राज्यपाल आर्.एन्. रवि यांनी केले. ते येथे ‘द लर्किंग हायड्रा : साऊथ एशियाज टेरर ट्रॅव्हल’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी बोलत होते.

राज्यपाल रवि म्हणाले की, या संघटनेचे १६ हून अधिक संस्था आहेत. यात विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष, मानवाधिकार संघटना आदींचा समावेश आहे. या सर्वांचा एकमेव उद्देश म्हणजे देशात अस्थिरता निर्माण करणे हा आहे. या संघटनेला विदेशातून अर्थपुरवठा होत आहे.

नागालँडमधील नागा जातीच्या लोकांना अमेरिका आणि ब्रिटन यांनी स्वतंत्र देशासाठी चिथावले होते !

राज्यपाल रवि पुढे म्हणाले की, अमेरिका आणि ब्रिटन यांनी नागालँडमधील नागा जातीच्या लोकांना स्वतंत्र देशासाठी चिथावले होते. ब्रिटिश उत्तरपूर्व भागात ब्रह्मदेशाच्या वर एक स्वतंत्र ख्रिस्ती देश बनवू इच्छित होते. यासाठी त्यांची अमेरिकेतील बाप्टिस्ट चर्च आणि इंग्लंड चर्च यांचे साहाय्य घेण्याची इच्छा होती. अमेरिकेने आसाममधील नागा जातीच्या लोकांना चिथावून पूर्वोत्तर भारतात अस्थिरता निर्माण केली होती. इंग्रज पूर्वोत्तर भारताला पाकिस्तानला जोडण्याची इच्छा बाळगून होते. त्याला नागा लोकांनी विरोध केला होता.