नवी मुंबई येथील पावणे एम्.आय.डी.सी.मध्ये लागलेल्या भीषण आगीत ३ जणांचा मृत्यू !

नवी मुंबई – येथील पावणे एम्आयडीसीमध्ये ६ मे या दिवशी रासायनिक आस्थापनाला लागलेल्या भीषण आगीत ६ आस्थापने जळून खाक झाली. या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला. आगीच्या घटनेनंतर चौकशी समिती नेमली जाणार आहे. अग्नीशमन दलाच्या गाड्या वेळेत न पोचल्याने तिघांचा बळी गेल्याचा आरोप संबंधित नातेवाइकांनी केला आहे. या घटनेची चौकशी होणार असल्याचे औद्योगिक सुरक्षा संचालक सुरेश जाधव यांनी म्हटले. आम्ही घटनास्थळी वेळेत पोचलो असलो, तरी आमच्याकडे आवश्यक तेवढा कर्मचारीवर्ग आणि गाड्या उपलब्ध नाहीत, असे एम्.आय.डी.सी. अग्नीशमन विभागाचे अधिकारी आर्.बी. पाटील यांनी मान्य केले आहे. (हे सांगण्यापेक्षा कर्मचाऱ्यांची भरती करणे आणि गाड्यांची संख्या वाढवणे या गोष्टी पूर्वी का केल्या नाहीत, हे सांगायला हवे ! – संपादक)