‘मिशो’ पोर्टलवर नियमबाह्य पद्धतीने गर्भपाताच्या औषधांच्या विक्रीप्रकरणी १३ ठिकाणी गुन्हे नोंद !
नागपूर – गर्भपातासाठी वापरात येणारी औषधांची ‘मिशो’ या ऑनलाईन पोर्टलवर नियमबाह्य पद्धतीने विक्री करण्यात आली. या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने राज्यात १३ ठिकाणी ‘मिशो’ आस्थापनावर ६ मे या दिवशी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या औषधांची ऑनलाईन विक्री होत असल्याची तक्रार अन्न आणि औषध मंत्र्यांकडे करण्यात आली होती.
१. या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी राज्यातील विविध भागांतून ‘मिशो’ आस्थापनावर विना अनुमती ‘एम्.टी.पी. किट’ या औषधाची मागणी नोंदवण्यात आली होती.
२. गर्भपातासाठी वापरात येणाऱ्या ‘अनवाँटेड किट’ आणि ‘डॉ. मोरपेन एम्.टी.पी. किट’ या नावाने विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या पॅकिंगमधील औषधांच्या प्रतिमा विक्रीसाठी प्रदर्शित होत असल्याचे आढळून आले होते.
३. मुंबई, ठाणे, कोल्हापूर, जळगाव आणि नागपूर या ठिकाणी अन्न आणि औषध निरीक्षकांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ करण्यासाठी ऑनलाईन माध्यमातून या औषधांची खरेदी केली. ही मागणी आधुनिक वैद्यांच्या अनुमतीविना स्वीकारली गेली.
४. मुंबई येथे ९, ठाणे येथे ३, कोल्हापूर येथे १, जळगाव येथे १, नागपूर येथे १ आणि संभाजीनगर येथे १, अशा एकूण १६ एम्.टी.पी. किट ‘कुरिअर पार्सल’द्वारे प्राप्त झाल्या. वाराणसी, आग्रा, उत्तरप्रदेश आणि देहली येथील पुरवठादारांकडून गर्भपाताची औषधे पाठवण्यात आली.
५. गर्भपाताच्या औषधांची अनधिकृत विक्री केल्याप्रकरणी ‘मिशो’शी संलग्न देहली आणि उत्तरप्रदेश येथील विक्रेत्यांविरुद्ध बृहन्मुंबई येथे ६, ठाणे येथे ३, कोल्हापूर, जळगाव, संभाजीनगर आणि नागपूर येथे प्रत्येकी १, अशा एकूण १३ तक्रारी विविध कलमांखाली पोलीस विभागाकडे प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.
संपादकीय भूमिका
|