अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा !

भंडारा – अल्पवयीन मुलीवर बळजोरीने अत्याचार करणारा रमेश येटरे (वय ३० वर्षे) याला ६ मे या दिवशी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी सश्रम १० वर्षे कारावास आणि ५ सहस्र रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. ही घटना ३ सप्टेंबर २०१७ या दिवशी घडली होती. घटना घडलेल्या दिवशी पीडितेची आई शेतावर गेली होती. अत्याचार प्रकरणी तिच्या आईने प्रविष्ट केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली होती.