संभाजीनगर येथील डॉक्टर महिलेचा डॉक्टर पतीकडून मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह कुटुंबावर गुन्हा नोंद !
संभाजीनगर – जानेवारी २०१९ मध्ये विवाह झालेल्या डॉक्टर महिलेचे पती डॉ. चैतन्य शिंदे यांनी मानसिक छळ करून त्यांना घराबाहेर काढले. या प्रकरणी विवाहितेच्या तक्रारीवरून पती डॉ. चेतन शिंदे, सासरे प्रल्हादराव शिंदे, लक्ष्मणराव खरोडे अन् कल्याण पंडितराव कणके यांच्या विरोधात येथील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला सध्या जळगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरचे शिक्षण घेतात. महिलेच्या माहेरच्यांनी विवाहात सोन्याचे दागिने आणि महागड्या वस्तू सासरच्यांना दिल्या होत्या; मात्र काही दिवसांनंतरच विवाह चांगले न लावल्याचा आरोप करत सासरच्या लोकांकडून विवाहितेला त्रास देणे चालू केले. पतीने त्यांना मारहाण करून घराबाहेर काढले, असे तक्रारीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक अनिता फासाटे पुढील अन्वेषण करत आहेत.
संपादकीय भूमिकाउच्चशिक्षित व्यक्तींनी असे करणे लज्जास्पद ! सध्याचे मेकॉलेप्रणित शिक्षण व्यक्तींवर संस्कार करण्यात अल्प पडते, हे दर्शवणारी घटना ! |