‘भारतीय सिंधू सभे’चे राष्ट्रीय अध्यक्ष लाधाराम नागवाणी यांची हिंदु जनजागृती समितीकडून सदिच्छा भेट !
अमरावती, ७ मे (वार्ता.) – भारतीय सिंधू सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. लाधाराम नागवाणी हे अमरावती दौऱ्यावर आले असतांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या वेळी शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. नीलेश टवलारे आणि सौ. अनुभूती टवलारे यांनी समितीच्या वतीने त्यांची भेट घेतली.
या वेळी श्री. नागवाणी म्हणाले, ‘‘सेवा तुम्ही करत आहात, तर माझा सत्कार करण्याची आवश्यकता नाही. तुमच्यासारख्या युवा हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची आज संघटनासाठी आवश्यकता आहे. अशानेच हिंदु राष्ट्राची स्थापना लवकर होईल.’’ या वेळी भारतीय सिंधू सभेचे जिल्हाध्यक्ष श्री. तुलसी सेठीया आणि श्री. शैलेंद्र मेघावणी आणि सौ. रूमा बजाज उपस्थित होत्या.