‘एक्सप्रेस फीडर’चे प्रलंबित काम मार्गी लावणार !
सोलापूर – शहराचा पाणीपुरवठा सध्या भारनियमन आणि अल्प दाबाचा वीजपुरवठा या समस्येमुळे विस्कळीत झाला आहे. वीजेच्या संदर्भातील समस्या सुटण्यासाठी ‘एक्सप्रेस फीडर’ची (जलदगतीने वीजपुरवठा करणारी वाहिनी) आवश्यकता आहे. काही वर्षांपूर्वी हे काम हाती घेण्यात आले होते. २ कोटी रुपयांच्या या कामांतील सव्वा कोटी रुपयांचे काम पूर्ण झाले आहे; मात्र वीजेचे केबल (वायर) चोरीला गेल्याने काम रखडले आहे. आता उर्वरित कामाची निविदा काढून प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे, असे पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. ते २ मे या दिवशी पालिका आयुक्त कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.