अन्य संप्रदायातील साधकाने सनातनमध्ये पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय केल्यावर त्याला विरोध करून त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणारे एक तथाकथित संत !
‘मी गेल्या काही वर्षांपासून एका संतांकडे सेवा करतो आणि त्यांनी रहाण्यासाठी दिलेल्या बंगल्यात रहातो. मी त्या संतांना सनातन संस्थेमध्ये साधनेसाठी पूर्णवेळ जाणार असल्याचे सांगितले, तेव्हा त्या संतांनी या विचारापासून परावृत्त करण्यासाठी मला कोरा धनादेश दिला, तसेच आणखी पैसा आणि गाडी देणार असल्याचे सांगितले. ते मला म्हणाले, ‘‘तुम्ही सनातनमध्ये गेलात, तर माझा आशीर्वाद तुमच्यासमवेत नसेल. तुमच्याकडे पैसा नाही. काही दिवसांनी पळून परत तुम्ही माझ्याकडे याल.’’
त्यांच्या या बोलण्याने आम्हाला काहीच विकल्प आले नाहीत. आम्हाला या सगळ्यात काही रस नाही. आम्हाला आता केवळ सनातनमध्ये साधना करायची आहे.’
– संप्रदायातील एक साधक