‘भारतीय नागरिक’ म्हणून घोषित केलेल्या व्यक्तीवर ‘परकीय’ म्हणून खटला चालवता येणार नाही ! – गुवाहाटी उच्च न्यायालय
गौहत्ती (आसाम) – आसामच्या परकीय नागरिक लवादाने एखाद्या नागरिकाला तो भारतीय असल्याचे घोषित केल्यानंतर पुन्हा त्याच्यावर परकीय असल्याच्या आरोपावरून खटला चालवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय गुवाहाटी उच्च न्यायालयाने दिला.
Once declared Indian, person cannot be tried for being foreigner again: Gauhati HChttps://t.co/IGBD2T0SeB
— The Indian Express (@IndianExpress) May 6, 2022
याआधी अनेक लोकांना ‘भारतीय नागरिक’ म्हणून घोषित केल्यानंतरही त्यांच्यावर परकीय नागरिक असल्यावरून लवादापुढे खटले चालवण्यात आले आहेत. अशा लोकांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात केलेल्या याचिकांची एकत्रितपणे सुनावणी करण्यात आली. उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या मे २०१९ मधील आदेशाचा संदर्भ देत वरील निकाल दिला.