मैसुरू (कर्नाटक) येथील एका गावाला ‘छोटे पाकिस्तान’ म्हणणाऱ्या मुसलमानांच्या चौकशीचा आदेश
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकमध्ये एक व्हिडिओ प्रसारित होत आहे. यात ईदचे नमाजपठण करून परतणारे मुसलमान त्यांच्या गावाला ‘छोटे पाकिस्तान’ म्हणत असल्याचे दिसत आहेत. या प्रकरणी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. हा व्हिडिओ मैसुरू जिल्ह्यातील नंजनगूडु तालुक्यातील कवलंदे गावातील असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये काही जण ‘अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे) अशी घोषणा देतांना दिसत आहेत.
[WATCH] Shocking viral video from Mysuru where an Eid crowd can purportedly be heard celebrating ‘Chhota Pakistan’!
CM Bommai promises action.
Listen to these reactions. pic.twitter.com/OyPa3x2itu
— TIMES NOW (@TimesNow) May 5, 2022
संपादकीय भूमिकादेशात जेथे मुसलमान बहुसंख्य आहेत, त्या भागाला बहुतेक करून ‘छोटे पाकिस्तान’ असे म्हटले जात असल्याचे ऐकिवात आहे. असे का झाले आहे, याचा शोध घेऊन ही स्थिती पालटण्याविषयी देशातील एकही निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी, तसेच शासनकर्ते कधीही तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या ! |