आनंदी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या सौ. मधुरा धनंजय कर्वे !

सौ. मधुरा कर्वे

१. आनंदी आणि हसतमुख

मधुराताई नेहमी हसतमुख आणि आनंदी असतात. व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगात ‘त्यांच्यातील आनंदाचे प्रक्षेपण होत असते’, असे मला जाणवते.

कु. मिल्की अगरवाल

२. इतरांचा विचार करणे

१७.४.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या २३ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमाच्या वेळी अनेक जिज्ञासू ‘संशोधन कक्षा’ला भेट देत होते. कक्षाला भेट देणार्‍या जिज्ञासूंची संख्या अधिक असल्यामुळे बसण्यासाठी आसंद्या अल्प पडत होत्या. तेव्हा ताई सहसाधकांना बसायला आसंदी देऊन स्वतः उभ्या रहात होत्या. माझी पाठ दुखत असल्याने त्यांनी तात्काळ उठून मला आसंदी उपलब्ध करून दिली आणि त्यांची शारीरिक क्षमता नसतांना त्यांनी माझी पाठ दाबून दिली.

३. तत्त्वनिष्ठ

त्यांच्या मनात कुणाविषयीही पूर्वग्रह नाही. त्या सर्वांशी समभावाने वागतात. त्या त्यांचा मुलगा श्री. राज यांच्याशीही तत्त्वनिष्ठतेने आणि एखाद्या सहसाधकाप्रमाणे वागतात. त्या सहसाधकांना जसे मार्गदर्शन करतात, तसेच मार्गदर्शन राजलाही करतात.

४. आध्यात्मिक संशोधन करणे आणि त्यासंबंधी लेख लिहिणे, या सेवा परिपूर्ण करणे

४ अ. सेवेतील अडचणी सोडवण्यासाठी साहाय्य घेणे : ताईंमध्ये स्वभावदोष आणि अहं यांचे प्रमाण अल्प आहे. एखाद्या प्रसंगात मनाचा संघर्ष होत असल्यास त्या तात्काळ सहसाधिका आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांचे साहाय्य घेतात आणि योग्य दृष्टीकोन ठेवून अल्पावधीतच त्या प्रसंगातून बाहेर पडतात. त्यामुळे त्यांच्या सेवांची फलनिष्पत्ती अधिक आहे.

४ आ. साधकांना संशोधन करण्याचे महत्त्व समजावून सांगणे : एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात होत असलेल्या यज्ञांच्या संदर्भात आध्यात्मिक संशोधनाच्या दृष्टीने काही प्रयोग चालू होते. एका यज्ञाविषयी अधिक संशोधन करण्यासाठी ताईंनी काही सूत्रे सांगितली; मात्र या सेवेतील काही साधकांना ही सूत्रे वैशिष्ट्यपूर्ण वाटत नव्हती. त्यामुळे साधक प्रयोग करण्यास सिद्ध नव्हते. त्या वेळी ताईंनी आग्रही भूमिका न घेता या संशोधनाचे महत्त्व साधकांना पुनःपुन्हा समजावून सांगितले. तेव्हा साधकांना त्याचे महत्त्व लक्षात आले आणि ते तो प्रयोग करायला सिद्ध झाले.

५. भाव

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि ते करत असलेले आध्यात्मिक संशोधन यांविषयी बोलतांना ताईंचा भाव जागृत होतो अन् हा भाव त्यांच्या डोळ्यांतून व्यक्त होतो.

मधुराताईंसारखी साधिका दिल्याबद्दल मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता वाटते.

– कु. मिल्की अगरवाल, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२०.४.२०२२)