परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या जन्मोत्सवाच्या वेळी गोव्यातील साधकांना आलेल्या अनुभूती
सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
१. सौ. विद्या अग्नि, फोंडा
१ अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘प्रत्येक कृती त्यांच्या कृपेमुळेच होत आहे आणि त्यांच्याप्रती भाव जागृत होऊन मन शांत आणि स्थिर झाले आहे’, असे अनुभवणे : ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी उठल्यापासून ‘प्रत्येक कृती मी करत नसून त्यांच्या कृपेमुळेच होत आहे. तेच माझ्या मनात त्यांच्या प्रती कृतज्ञतेचा भाव निर्माण करत आहेत’, असे मी अनुभवले. मला दोन दिवस कोणतेही शारीरिक त्रास झाले नाहीत. माझे मन शांत आणि स्थिर होते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मला हे अनुभवता आले, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.’
२. श्री. शिवदत्त नाडकर्णी, फोंडा
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त घरातील फलकावर प्रार्थना लिहितांना पुष्कळ भावजागृती होऊन भावाश्रू येणे : ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७८ व्या वाढदिवसानिमित मी घरातील फलकावर प्रार्थना लिहित होतो. ‘हे विष्णुस्वरूप गुरुदेवजी, आपके अवतारी कार्य को अनुभव करने हेतु आप हम सब को आपके साथ इस पृथ्वी पर लेकर आए हैं । हे कृपासिंधु, इसी तरह हम केवल इस जन्म में नहीं; अपितु हर जन्म में आपके और केवल आपके ही बने रहें, ऐसी हम पर कृपा कीजिए, यही आपके चरणों में प्रार्थना है !’ ही प्रार्थना लिहितांना माझा भाव जागृत होऊन माझ्या डोळ्यांतून सतत भावाश्रू येत होते. ही प्रार्थना फलकावर लिहितांना मी एका साधकाशी भ्रमणभाषवर सेवेविषयी बोलत होतो, तरीही माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येतच होते. प्रार्थना पूर्ण लिहून होईपर्यंत मी ही भावस्थिती अनुभवली.
३. श्री. अंकुश नाईक, बोरी
३ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेल्या भावसोहळ्याच्या वेळी पुष्कळ आनंद जाणवून साधकाला ‘स्वतः आश्रमातच रहात असून या सोहळ्यामुळे साधनेत पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळाली’, असे वाटणे : ‘१३.५.२०२० आणि १५.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त झालेला भावसोहळा बघितला. तो शब्दात मांडणे कठीण आहे. १३.५.२०२० या दिवशी दिवसभर ‘परात्पर गुरु डॉक्टर आमच्या घरी आले आहेत’, असा भाव टिकून होता. घरी पूजा-अर्चा-दीप-धूप सर्व आनंदात झाले. आम्हाला परात्पर गुरु डॉक्टरांचे अस्तित्व घरात जाणवत होते. हा भावसोहळा म्हणजे आनंदाची पर्वणीच होती. आम्ही हा ‘ऑनलाईन’ भावसोहळा एका साधकाच्या घरी पहाणार असूनसुद्धा ‘मी दोन दिवस आश्रमातच आहे’, असे मला जाणवत होते. या भावसोहळ्यामुळे ‘ईश्वराने आम्हाला साधनेत पुढे जाण्यासाठी ऊर्जा दिली’, असे मला जाणवत होते. त्यामुळे मनात सतत कृतज्ञतेचा भाव जाणवत होता.
४. सौ. अंजली अंकुश नाईक, बोरी
४ अ. झालेला त्रास
१. १३.५.२०२० या दिवशी भावसोहळा बघतांना आरंभी मला पुष्कळ त्रास जाणवायला लागला. मला काहीच समजत नव्हते. शेवटी प्रार्थना आणि आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यानंतर मला बरे वाटले.
४ आ. चांगल्या अनुभूती
१. ‘परात्पर गुरु (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपल्या घरी येणार’, या भावाने मी घराची स्वच्छता करत होते. मी शेवटची पायरी पुसत असतांना परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले) सूक्ष्मातून आले आणि ‘स्वच्छता करतेस का ?’, असे म्हणत माझ्याकडे पाहून हसले. तेव्हा माझा भाव जागृत झाला.
२. दुसर्या दिवशी ‘प्रसादासाठी लाडू करतांना ते परम पूज्यांना अर्पण करायचे आहेत’, म्हणून भावपूर्णपणे केले गेले.
३. परात्पर गुरुमाऊली (परात्पर गुरु डॉ. आठवले) लहान मुलांना हाताला धरून चालतांनाचा प्रसंग बघतांना ‘आमची मुले लहान असतांना ते असेच आमच्या मुलांचा हात धरत होते, त्यांना चॉकलेट देते होते आणि त्यांना ‘चांगली साधना करा’, असे सांगत होते’, हे आठवले. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती झाली. आई-वडिलांनी जे प्रेम आम्हाला दिले नाही, ते गुरुदेवांनी आम्हाला दिले. त्यांनी आम्हाला पुष्कळ माया लावली.
५. सौ. सुविधा रमेश फडके, शिरोडा
५ अ. नातीच्या नावाने विज्ञापन देण्याचा विचार मनात येणे; पण तेवढी रक्कम जवळ नसणे, तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘पैशांची व्यवस्था होऊदे’, अशी प्रार्थना करणे, त्यांनतर भाचीकडे येणे असलेली रक्कम तिने परत देणे : परात्पर गुरुमाऊलीच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले) जन्मोत्सवासाठी आमच्याकडून प्रतिवर्षी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये विज्ञापन दिले जायचे. या वर्षी माझ्या मुलाला ६ वर्षांनी कन्यारत्न झाले; म्हणून माझ्या मनात ‘तिच्या नावाने विज्ञापन देऊया’, असा विचार आला. मी विज्ञापनाचे लिखाण लिहून दिले, त्या वेळी माझ्याकडे तेवढे पैसे नव्हते; म्हणून मी गुरुदेवांना भावपूर्ण प्रार्थना केली, ‘गुरुमाऊली, विज्ञापन देण्याचा विचार आपणच मला दिला आहे, तरी आता देवा (परात्पर गुरु डॉ. आठवले), पैशांची व्यवस्थाही तूच करून घे.’ जन्मोत्सवाच्या आधी ८ दिवस मी माझ्या माहेरी गेले होते. माझ्या भाचीकडून माझे बरेच दिवस पैसे येणे बाकी होते. मी तिथून परत यायच्या दिवशी तिने ते पैसे माझ्या हातावर ठेवले आणि माझ्या मनातील इच्छा गुरुकृपेने पूर्ण झाली; म्हणून त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक १७.५.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |