राजगडावर (जिल्हा संभाजीनगर) ७ दरवाजांना नवी झळाळी; सहस्रोंच्या उपस्थितीत प्रवेशद्वारांचे लोकार्पण !
वेरूळ/ राजगड – स्वराज्याची पहिली राजधानी स्वराज्य मंदिर राजगड येथे ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संस्थेच्या वतीने १ मे या दिवशी महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधत दुर्गदिनाच्या निमित्त किल्ल्यावरील ७ प्रवेशद्वारांचा दुर्गार्पण सोहळा सहस्रों दुर्गसेवकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला. गडावरील ७ खचलेल्या ठिकाणी विशेष कारागिरांकडून सिद्ध करण्यात आलेले ७ सागवानी दरवाजे बसवण्यात आले आहेत. या वेळी हेलिकॉप्टरद्वारे सर्व प्रवेशद्वारांवर पुष्पवृष्टी करण्यात आली होती. प्रतिष्ठानमध्ये संभाजीनगर जिल्ह्याचा सक्रिय सहभाग आहे.
छत्रपती शिवरायांचा राजमार्ग असलेल्या पाली मार्गावरील २ प्रवेशद्वारे, गुंजवणे या मार्गाने येणार्या चोर मार्गांवरील ३ प्रवेशद्वारे, संजीवनी माची प्रवेशद्वार आणि बालेकिल्ला अशी प्रवेशद्वारे आहेत.