मेहसाणा (गुजरात) येथे भोंग्यांवरून आरती ऐकल्याने झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू
मेहसाणा (गुजरात) – मेहसाणा जिल्ह्यातील लंघनाज गावात मंदिरात भोंग्यांवरून आरती ऐकवल्याच्या प्रकरणी जसवंतजी ठाकोर या ४२ वर्षीय व्यक्तीची त्याच्याच समाजातील व्यक्तींनी हत्या केली. या प्रकरणी ६ जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Gujarat: 40-year-old killed for performing Aarti on loudspeaker in Meldi Temple of Mahesana, six arrestedhttps://t.co/bDNFCTup2Z
— OpIndia.com (@OpIndia_com) May 6, 2022
मृत जसवंतजी ठाकोर यांचे भाऊ अजित यांनी पोलिसांना सांगितले की, जसवंत आणि मी मंदिरात आरती करत होतो. आम्ही भोंग्यांवर ही आरती ऐकवत होतो. तेवढ्यात रागावलेल्या सदाजीने शिवीगाळ करण्यास चालू केली आणि त्याच्या साथीदारांना बोलावले. त्यानंतर ५ जण काठ्या घेऊन आले आणि आम्हाला मारहाण केली.