अजान देण्यासाठी भोंग्याची आवश्यकता नाही ! – अब्दुल कादिर मुकादम, इस्लाम अभ्यासक
मुंबई – मशिदीवरील भोंगे ७० च्या दशकानंतर चालू झाले. इस्लामचा जन्म झाला, तेव्हापासून ध्वनीक्षेपकावर कधीच अजान दिली गेली नव्हती. त्यामुळे अजान देण्यासाठी भोंग्याची आवश्यकता नाही, असे मत इस्लामिक अभ्यासक अब्दुल कादिर मुकादम यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
मुकादम यांनी अजानसाठी स्थानिक रेडिओचा पर्याय सुचवला आहे.