जम्मू येथील सहस्रो एकरचा ‘लँड जिहाद’ उघड केल्याचा परिणाम !
‘झी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीचे संपादक सुधीर चौधरी यांच्या विरोधात केरळमध्ये अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा गुन्हा नोंदवतांना त्यात म्हटले आहे की, ११ मार्च २०२० या दिवशी ‘झी न्यूज’वर प्रसारित झालेल्या ‘डी.एन्.ए.’ या कार्यक्रमामध्ये सुधीर चौधरी यांनी मुसलमानांना अपमानित केले. या कार्यक्रमात चौधरी यांनी जिहादविषयी सारणी (तक्ता) दाखवली होती. त्यात जिहादच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती दिली होती.’ (संदर्भ : दैनिक ‘सनातन प्रभात’)