हलाल अर्थव्यवस्थेचे षड्यंत्र रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून जनजागृती आणि प्रतिसाद !
हलाल प्रमाणपत्र घेण्याची पद्धत आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर किती गंभीर परिणाम करत आहेत आणि त्याचा पैसा आतंकवाद्यांना म्हणजे उलट हिंदूंना मारण्यासाठीच कसा वापरला जात आहे, याविषयी हिंदु जनजागृती समिती आणि अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते व्याख्याने, प्रवचने आदी माध्यमांतून देशभर जनजागृती करत आहेत. विशेषतः उद्योजक आणि व्यापारी यांचेही प्रबोधन केले जात आहे. हिंदू आणि राष्ट्र यांना वाचवायचे असेल, तर ‘हलाल प्रमाणपत्रा’चे षड्यंत्र हाणून पाडावे लागेल !
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती.
परिणाम ! : कित्येक छोट्या व्यापार्यांनी हलाल प्रमाणपत्र असणारी उत्पादने त्यांच्याकडे ठेवणे बंद केले आहे. कोल्हापूर, निपाणी, इचलकरंजी, देवगड येथे असा निर्णय व्यापार्यांनी घतला. अनेक धर्माभिमानी हिंदूंनीही हलाल प्रमाणित उत्पादने घेणे बंद केले आहे.
हलाल अर्थव्यवस्थेचे षड्यंत्र रोखण्यासाठी विविध उपाय योजून या विरोधातील लढ्यात सहभागी व्हा !
१. हलाल अर्थव्यवस्थेला साहाय्य होऊ नये; म्हणून हलाल मांस घेणे किंवा ते असलेले पदार्थ खाणे बंद करायला हवे.
२. हलाल प्रमाणपत्राचा शिक्का असलेल्या सर्व वस्तू नाकारून हिंदु बांधवांचा व्यवसाय वाढावा या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत.
३. हिंदु समाजात या संकटाविषयी जागृती करायला हवी.
४. आंदोलन उभे करून सरकारकडे संघटितपणे तक्रारी करायला हव्या.
५. खासगी मुसलमान संस्थांना हलाल प्रमाणपत्र देण्यास बंदी घालण्याची अन् तो अधिकार शासकीय संस्थेकडे देण्याची मागणी करायला हवी.
६. आपल्या भागातील हिंदुत्वनिष्ठ राजकीय नेत्यांना या संकटाची माहिती द्यायला हवी.
७. व्यापक जागृतीसह शासनाकडे हलाल प्रमाणपत्र हद्दपार करण्याची मागणीही लावून धरायला हवी.
या सर्व दृष्टीने प्रयत्न करून हलाल अर्थव्यवस्थेतून निर्माण होणारे राष्ट्रावरील संकट रोखण्यासाठी लढा उभारूया ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती (३१.११.२०२१)