पावणे (नवी मुंबई) औद्योगिक वसाहतीतील ९ आस्थापनांना भीषण आग
नवी मुंबई – पावणे औद्योगिक वसाहतीतील (एम्.आय.डी.सी.) ‘वेस्ट क्लाय पॉलिकॅब’ या रासायनिक आस्थापनाला ६ मे या दिवशी दुपारी भीषण आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. ५ अग्नीशमन बंबांद्वारे ही आग विझवण्याचा प्रयत्न केला जात होता.
Maharashtra Breaking News LIVE Updates : नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीतील वेस्ट क्लाय पॉलिकॅब या रासायनिक कंपनीला भीषण आगhttps://t.co/J8loXQWykX pic.twitter.com/prPD9rDCYi
— ABP माझा (@abpmajhatv) May 6, 2022
आग भीषण असल्याने सायंकाळी ७ पर्यंत शेजारील ९ आस्थापने या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग कशामुळे लागली. याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीत काही कर्मचारी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात आहे; मात्र अग्नीशमन दलाने या वृत्ताला अधिकृत दुजोरा दिला नाही. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न उशिरापर्यंत चालू होते.