बुलढाणा येथे २ बनावट आधुनिक वैद्य कह्यात !
बुलढाणा – शहरातील देवी मंदिर परिसरातील चिकित्सालयावर धाड टाकून आरोग्य विभागासह पोलिसांनी सराव करणार्या २ बनावट आधुनिक वैद्यांना कह्यात घेतले. कपिल कुमार आणि विनोद शर्मा अशी कह्यात घेतलेल्या बनावट आधुनिक वैद्यांची नावे आहेत. ते दोघे हरियाणा राज्यातील कर्नाट येथील आहेत.
आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली शेकडो रुग्णांना लाखोंचा गंडा; २ बोगस डॉक्टरांना ठोकल्या बेड्या#Buldhana #Crime #BuldhanaNews #SaamTV #SaamDigital #SaamNews #SaamMarathi https://t.co/RGSLDB732e
— SaamTV News (@saamTVnews) May 5, 2022
गुप्त माहितीच्या आधारे पकडण्यात आलेल्या या बनावट आधुनिक वैद्यांकडे पदवी प्रमाणपत्र आणि वैद्यकीय असोसिएशनचे प्रमाणपत्रही नाही. हे बनावट आधुनिक वैद्य साध्या आजारापासून ते लैंगिक समस्यांचे निवारणही करत होते. गेल्या काही दिवसांपासून या बनावट आधुनिक वैद्यांच्या तक्रारी येत होत्या, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांनी दिली.
संपादकीय भूमिकासर्व यंत्रणा हाताशी असतांना केवळ २ बनावट आधुनिक वैद्यांवर वरवरची कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच बनावट आधुनिक वैद्यांची पाळेमुळे खणून काढली पाहिजेत ! |