आता हृदयाला देवाविना कशाचीच आस ना उरली ।
देवा, देऊ का रे हृदयाला सहस्र धन्यवाद ।
किती रे ते शहाणे, देत होते तुझ्या हाकेला साद ।
कपाटात (टीप) बसून होत होती ना त्याची साधना ।
तुझ्या प्रत्येक वस्तूप्रती ते व्यक्त करत होते ना कृतज्ञता ।। १ ।।
सांगू का देवा, ते वाट पहायचे उघडेल कधी दार ।
तुझ्या दर्शनाने व्हायचे तृप्त, न घेतली कधी माघार ।
कोपऱ्यांत बसून त्याला वाटायचे,
‘कधी जाईल माझ्याकडे देवाचे लक्ष’ ।
सात वर्षांनी साधना पूर्ण झाली, होते ना रे ते सदैव दक्ष ।। २ ।।
त्याला जाणीव होती, कपाटाचा हा कोपरा
देव हळूवार जपत आहे ।
‘मनात का असेना’ त्याच्याशी चार शब्द बोलत आहे ।
देवाच्या मनीचे गुज ते जाणून होते ।
म्हणूनच वाट पहाण्यात ते माघार घेत नव्हते ।। ३ ।।
देवाशी गुजगोष्टी करता करता दिवस-रात्र-मास-वर्षे सरली ।
आता त्याला देवाविना कशाचीच आस ना उरली ।
देव मोठा लबाड, त्याने हीच साधना करवून घेतली ।
आणि देवाने साऱ्यांना बाजूला सारून त्याला ओंजळीत धरले ।। ४ ।।
हळूवार देव त्याच्या कानी वदला, ‘झाले ना जीवनाचे सार्थक’ ।
प्रतीक्षा करत होतास ना किती अथक ।
देवाच्या या मधुर स्वराने त्याचे नयन भरून वाहिले ।
ओंजळीत झाला सागर, त्यात ते तरंगू लागले ।। ५ ।।
देवाने डोळे भरून एक नवल पाहिले ।
त्या सागरात एक पिंपळ पान तरंगत होते ।
त्या हृदयाचा कृष्ण होऊन ।
बासरीचा मधुर स्वर काढत होते ।। ६ ।।
ते आर्त स्वर सांगत होते ।
सनातन धर्माचा सूर्योदय होत आहे ।
आम्ही पाहिले, देव हळूवार खाली वाकले ।
त्यांनी कृष्णभाळावर अधर टेकले ।। ७ ।।
टीप : परात्पर गुरु डॉक्टर पुष्पांजली यांची सर्व पत्रे कपाटात ठेवतात. ‘ती पत्रे म्हणजेच माझे हृदय असून ते तुमच्या कपाटात बसून साधना करील’, असा पुष्पांजली यांचा भाव आहे.
– कृष्णपुष्प (पुष्पांजली)((आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), बेळगाव (५.११.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |