आधुनिक वैज्ञानिकांनी सांगितलेली देशी गायीच्या दुधाची बहुउपयोगिता !
‘गाय मानवी जीवनासाठी अत्यंत हितकारी आहे. शास्त्रांमध्ये गायीला ‘माता’ म्हटले गेले आहे. गायीच्या दुधाची बहुउपयोगिता आता वैज्ञानिकांनीही विविध प्रयोगांद्वारे सिद्ध केली आहे.
वैज्ञानिकांच्या मते गायीच्या दुधात ८ प्रकारचे प्रोटीन्स, ६ प्रकारचे व्हिटॅमिन्स (जीवनसत्त्वे), २१ प्रकारचे अमिनो ॲसिड, ११ प्रकारचे मेद (चरबी) युक्त ॲसिड, २५ प्रकारची खनिज तत्त्वे, १६ प्रकारचे नायट्रोजन यौनिक, ४ प्रकारचे फॉस्फोरस यौगिक, २ प्रकारची शर्करा, याखेरीज मुख्य खनिजे – सोने, तांबे, लोह, कॅल्शियम, आयोडिन, फ्लोरिन, सिलिकॉन इत्यादी आढळून येतात. ही सर्व तत्त्वे गायीमध्ये विद्यमान असल्याने देशी गायीचे दूध एक उत्कृष्ट प्रकारचे रसायन (टॉनिक) आहे, जे शरिरात जाऊन रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा आणि वीर्य यांची यथायोग्य प्रमाणात वृद्धी करते. हे पित्तशामक आणि बुद्धीवर्धक असून सात्त्विकता वाढवते.
आधुनिक वैज्ञानिकांच्या दृष्टिकोनातून गोदुग्ध
अनेक वैज्ञानिकांनी गोदुग्धावर केलेल्या संशोधनाच्या आधारे आपापली मते व्यक्त केली आहेत, ज्यांपैकी काही येथे देत आहोत.
अ. ‘गायीचे दूधच एकमेव असे पेय आहे की, जे सर्व पौष्टिक द्रव्यांनी परिपूर्ण आहे, ज्याला आपण संपूर्ण आहार म्हणू शकतो.’ – प्रो. एम्.जे. रोसेनो, हॉर्वर्ड चिकित्सा विद्यालय
आ. ‘मातेच्या दुधानंतर गायीचे दूध सर्वाधिक उपयोगी आहे.’ – जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यू.एच्.ओ.)
इ. ‘हृदयरुग्णांसाठी गायीचे दूध विशेष रूपाने उपयोगी आहे !’ – डॉ. शांतीलाल शहा, अध्यक्ष, इंटरनॅशनल कार्डियोलॉजी कॉन्फरन्स
ई. ‘गायीच्या दुधात असलेले सेरेब्रोसाइड्स (मधुमेद) मेंदू आणि स्मरणशक्तीच्या विकासात साहाय्यक असते. स्ट्राँटिशम (चांदीसारखा धातू) अणू-विकिरणांचे प्रतिरोधक असते. एम्.डी.जी.आय. प्रोटीनमुळे रक्तकोशिकांमध्ये कॅन्सरचा (कर्करोगाचा) शिरकाव होऊ शकत नाही.’ – प्रा. रोनाल्ड गोरायटे, पशूविज्ञान विशेषज्ञ, कार्नेल विश्वविद्यालय, न्यूयॉर्क, अमेरिका
उ. ‘जर गायीने एखादा विषारी पदार्थ खाल्ला, तर त्याचा परिणाम तिच्या दुधावर होत नाही. गायीच्या शरिरात सामान्य विष पचवण्याची अद्भुत क्षमता असते.’ – डॉ. पीपल्स
ऊ. ‘गायीच्या दुधात बुद्धी कुशाग्र करण्याचा विशेष गुण आहे. मी याचा प्रयोग लहान मुलांवर करून पाहिला. ज्या मुलांनी गायीचे दूध प्यायला आरंभ केला, त्या मुलांची प्रतिभा आणि मेधाशक्तीचा विकास स्पष्टपणे दिसून आला अन् ज्या मुलांना म्हशीचे दूध प्यायला दिले, ती मुले मंदमती अन् आळशी होऊ लागली.’ – प्रा. जे. एल्. सहस्रबुद्धे, कृषी महाविद्यालय, पुणे.
ए. ‘शरिरात शिरलेल्या रेडिओधर्मी विकिरणांचा प्रभाव नष्ट करण्याची असीम क्षमता गायीच्या दुधात आहे.’ – प्रसिद्ध वैज्ञानिक शिरोविच, रशिया
ऐ. ‘गायीच्या दुधाची साय पूर्णतः मानवी शरिरास अनुकूल आहे, जी लगेच पचून शक्ती देते.’ – डॉ. एन्.एन्. गोडवेल
ओ. जर्सी गायीचे दूध प्यायल्याने कॅन्सर वाढण्याची ३० टक्के शक्यता असते; म्हणून तथाकथित जर्सी, होल्सटीन गायीच्या दुधापासून सावधान रहावे. जर्सी गायीचे दूध, दही, तूप यांचे सेवन टाळावे.’ – नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, अमेरिका
(साभार : मासिक, ‘लोक कल्याण सेतू’, जून २०१७)