सप्टेंबर अखेरपर्यंत राज्यात मतदान होणे शक्य नाही ! – राज्य निवडणूक आयोग

मुंबई – निवडणुकीच्या पहिल्या ३ टप्प्यांची कामे पावसामुळे छताखाली होत असतात. राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका सप्टेंबर अखेरपर्यंत होणे शक्य नाही, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिली.

सर्वाेच्च न्यायालयाने ४ मे या दिवशी २ आठवड्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्याचा आदेश दिला आहे. यावर निवडणूक कार्यक्रमाची सविस्तर माहिती देतांना किरण कुरुंदकर म्हणाले, ‘‘प्रभाग रचना, आरक्षण सोडत, मतदान सूची करणे आणि निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा अशा ४ टप्प्यांत निवडणूक होते. यासाठी किमान ३० ते ४० दिवस लागतात. जुलै आणि ऑगस्ट या कालावधीत भरपूर पाऊस असतो. मुंबई-कोकणात तर पावसाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे निवडणुका पावसाळ्यात घेणे शक्य नाहीत.’’