राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी घेतली मागासवर्गीय आयोगाची भेट !
मुंबई – इतर मागासवर्गीय आयोगाची सर्वंकष माहिती लवकरात लवकर सादर करावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी ५ मे या दिवशी इतर मागासवर्गीय आयोगाचे जयंतकुमार बांठिया यांसह अन्य सदस्य यांची भेट घेतली. या शिष्टमंडळामध्ये अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री मंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. सर्वाेच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीय आयोगाची सर्वंकष माहिती सादर करण्याचा आदेश राज्यशासनाला दिला आहे. त्यानुसार इतर मागासवर्गीय आयोग ही माहिती गोळा करत आहे.