साईबाबा आणि शनि शिंगणापूर मंदिरातील ध्वनीवर्धकावरील आरती बंद !
नगर – जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या श्री साईबाबांच्या मंदिरावरील वर्षांनुवर्षे चालू असलेली रात्रीची शेजारती, तसेच पहाटेची काकड आरतीही ध्वनीवर्धकावरून बंद करण्यात आली, अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. शनी शिंगणापूर देवस्थाननेही ध्वनीवर्धकावरील काकड आरती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.