६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बेळगाव येथील चि. अविर प्रतीक कागवाड (वय १ वर्ष) !
वैशाख शुक्ल द्वितीया (२.५.२०२२) या दिवशी बेळगाव येथील चि. अविर प्रतीक कागवाड याचा पहिला वाढदिवस झाला. या आनंद क्षणी सनातनचे धर्मप्रचारक संत पू. रमानंद गौडा यांनी चि. अविर प्रतीक कागवाड याची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के असल्याचे घोषित केले. या वेळी सर्व साधकांचा भाव जागृत झाला. या वेळी चि. अविर कागवाड याचे वडील श्री. प्रतीक कागवाड, आई सौ. निकिता प्रतीक कागवाड, आजी सौ. आशा कागवाड, आजोबा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दिलीप कागवड, मामा श्री. नचिकेत, सनातनच्या ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. तारा शेट्टी आणि साधक ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. बापू सावंत हेही उपस्थित होते.
यानिमित्त अविरच्या आजी-आजोबांना (वडिलांच्या आई-वडिलांना) त्याच्या जन्मानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
अविरचा अर्थ : शूर, शांतीसाठी लढणारा
चि. अविर प्रतीक कागवाड याला प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’– (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
१. गर्भारपण
अ. ‘सौ. निकिता (सून) हिच्या गर्भारपणात माझा मुलगा श्री. प्रतीक याने आरंभापासूनच ‘प.पू. भक्तराज महाराज यांची भजने लावणे, प्रार्थना आणि नामजप करणे’, अशा कृती करण्यास आरंभ केला होता. निकिता वेगळ्या संप्रदायाप्रमाणे साधना करते. त्यांना सांगितल्यानुसार ती नामजप आणि प्रार्थना करत होती.
आ. निकिता आरंभी नोकरी करत होती. तिची नोकरीतील व्यस्तता आणि गरोदरपण, असे असूनही ती आनंदी होती.’
– सौ. आशा दिलीप कागवाड (आजी (वडिलांची आई)), बेळगाव, कर्नाटक.
२. जन्मानंतर
२ अ. वय जन्म ते ४ मास
१. ‘चि. अविर जन्मापासून स्वभावाने शांत आहे. तो दिवसा किंवा रात्री मुळीच रडत नाही.
– श्री. दिलीप कागवाड आणि सौ. आशा दिलीप कागवाड (आजोबा आणि आजी (वडिलांचे वडील अन् आई)), बेळगाव, कर्नाटक.
२. ‘गुरुदेव दत्त ।’, असे म्हटल्यावर तो हसतो आणि स्वतःही तसे म्हणण्याचा प्रयत्न करतो.’ – सौ. आशा दिलीप कागवाड
२ आ. वय ५ ते ८ मास
‘मध्यंतरी मला बरे नव्हते. तेव्हा मी १५ दिवस रुग्णालयामध्ये भरती होतो. मी घरी आल्यानंतर त्याला माझ्याजवळ आणल्यावर ‘मला त्याच्याकडून ऊर्जा मिळत आहे’, असे मला जाणवले.
२ इ. ९ मास ते १ वर्ष
२ इ १. ओळख असल्याप्रमाणे सद्गुरु स्वाती खाडये यांच्याकडे जाणे : एक मासापूर्वी सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडयेताई आमच्याकडे आल्या होत्या. त्या वेळी तो झेप घेत त्यांच्याकडे गेला. तेव्हा सद्गुरु स्वातीताई आम्हाला म्हणाल्या, ‘‘आमची मागच्या जन्मीची ओळख आहे; म्हणून तो माझ्याकडे आला.’’
२ इ २. रामनाथी आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे
अ. २.४.२०२२ या दिवशी आम्ही रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. आम्ही मुख्य दारातून आत येत असतांना त्याने हाताची मुद्रा केली होती.
आ. आम्हाला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भेटल्या. तेव्हा अविर त्यांच्याकडे बघून हसला.
इ. आम्हाला एका संतांचा सत्संग मिळाला. तेव्हा त्यांनी अविरला जवळ घेतले. ते पाहून ‘धन्य झालो’, असे मला वाटले. तेव्हा माझा भाव जागृत होऊन मला कृतज्ञताही वाटली.’
‘गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आम्हाला असा गुणी नातू दिला’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! ’
– श्री. दिलीप कागवाड आणि सौ. आशा दिलीप कागवाड (मार्च २०२२)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता. |