ब्रिटनच्या संसदेत अश्लील चित्रपट पहाणाऱ्या खासदाराचे त्यागपत्र

संसद भवनात दोनदा अश्लील चित्रपट पाहिल्याच्या प्रकरणी ब्रिटनच्या नील पॅरिश नावाच्या खासदाराचे त्यागपत्र

लंडन (ब्रिटन) – संसद भवनात दोनदा अश्लील चित्रपट पाहिल्याच्या प्रकरणी ब्रिटनच्या नील पॅरिश नावाच्या खासदाराला त्यागपत्र द्यावे लागले आहे. पॅरिश सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार आहेत. नील पॅरिश हे ब्रिटनच्या टिव्हर्टन आणि हॉनिटन येथून खासदार म्हणून निवडून आले.

त्यागपत्र दिल्यावर ते म्हणाले की, हा माझा वेडेपणा होता आणि मी जे केले, त्याचा मला गर्व नाही. मी मनापासून क्षमा मागतो.