पुण्यातील पुण्येश्वर मंदिरातच महाआरती करण्यावर मनसे ठाम !

पुणे – येथील कसबा पेठ परिसरातील पुण्येश्वर मंदिरात महाआरती करण्याचा निर्णय मनसे कार्यकर्त्यांनी घेतला. मंदिराला लागून छोटा शेख सल्ला मशीद आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला; मात्र पुणे पोलिसांनी अद्याप अनुमती दिली नाही. मंदिर परिसरात पुणे पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला आहे. राज ठाकरेंचा आदेश हा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, अशी चेतावणी मनसैनिकांनी दिली आहे. मनसे कार्यकत्यांना पोलिसांनी नोटीसाही बजावल्या आहेत.

नामदेवाच्या गाथेमध्ये उल्लेखलेले आणि पुणे शहराचे नाव ज्यावरून पडले असे पुण्येश्वर महादेवाचे मंदिर आहे. इमारतीच्या बांधकामासाठी खोदकाम करतांना धाकटा शेख सल्ला दर्ग्याच्या परिसरात पुरातन पुण्येश्वर मंदिराचे अवशेष सापडले आहेत. या जागेत पूर्वी यादवांच्या काळातील पुण्येश्वर मंदिर होते. त्यामुळे या मंदिराला आणि या परिसराला ऐतिहासिक महत्त्व आहे.