मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिली पोलिसांना तुरी !
मुंबई – मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना कह्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या हातावर तुरी देऊन त्यांनी पलायन केले. या वेळी त्यांच्यासमवेत मनसेचे कार्यकर्ते संतोष धुरी हेही होते.
४ मे या दिवशी शिवाजी पार्क येथे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधल्यानंतर तेथे आलेल्या पोलिसांनी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना कह्यात घेणार असल्याचे सांगितले. या वेळी काही अंतर पोलिसांसमवेत जाऊन बाजूला असलेल्या एका खासगी गाडीत बसून दोघांनी पलायन केले. यामध्ये झालेल्या झटापटीत एका महिला पोलिसाला दुखापत झाली. यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.’’