एप्रिलमध्ये निर्यातीत २४ टक्क्यांची वाढ !

चेन्नई (तमिळनाडू) – एप्रिल २०२२ मध्ये निर्यातीमध्ये गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत २४ टक्क्यांची वाढ झाली असून ३८.१९ अब्ज डॉलर्सचा (२ लाख ९१ सहस्र कोटी रुपयांहून अधिकचा) व्यापारी माल भारतातून निर्यात झाला.

याच कालावधीत ५८.२६ अब्ज डॉलर्सची (४ लाख ४५ सहस्र कोटी रुपयांहून अधिकची) आयात करण्यात आली असून हा आकडा २६.६ टक्क्यांहून अधिक आहे. तेलाच्या किमतीमध्ये वाढ होणे, हे आयात अन् निर्यात यांमागील प्रमुख कारण आहे.