राणा दांपत्याला जामीन संमत !

डावीकडून रवि राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा

मुंबई – राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असणाऱ्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाने जामीन संमत केला आहे. १२ दिवसांनी त्या दोघांची कोठडीतून सुटका झाली आहे. आमदार रवी राणा यांच्याविरोधात १७, तर खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात ६ गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे सरकारी अधिवक्त्यांनी राणा दांपत्याच्या जामिनाला विरोध केला होता.

काही दिवसांपूर्वी राणा दांपत्याने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यासाठी ते दोघे अमरावती येथून मुंबईत आले होते. या प्रकरणात अनेक घडामोडी घडल्या. त्यानंतर त्या दोघांना अटक करण्यात आली होती.