‘रझा अकादमी’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ समाजात द्वेष पसरवत आहेत ! – आमदार नीतेश राणे, भाजप

आमदार नीतेश राणे, भाजप

मुंबई, ४ मे (वार्ता.) – ‘रझा अकादमी’ ही आतंकवादी संघटना आहे. अमरावती आणि नांदेड येथे घडवलेली दंगल, हे त्याचे उदाहरण आहे. ‘रझा अकादमी’ या संघटनेची धर्मादाय आयोगाकडे नोंदणी नाही. ‘रझा अकादमी’ आणि ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ समाजात द्वेष पसरवत आहेत, असे ‘ट्वीट’ भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी केले.

नोंदणीकृत संस्था नसूनही राज्य सरकार रझा अकादमीच्या आंदोलनाला अनुमती देते आणि सुरक्षा पुरवते. या संघटनेची चौकशी केल्यास ‘त्यांना निधी कोण देतो ?’, हे कळेल. त्यांची वेळ आता आली आहे.

खरा मुसलमान कधीही महाराष्ट्र आणि भारत यांच्या विरोधात जाणार नाही. हिंदू आणि अन्यांप्रमाणे त्यांचे या भूमीवर प्रेम आहे, असेही नीतेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

दोन्ही संघटनांविषयी सखोल अन्वेषण करून त्यांच्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, असे हिंदूंना वाटते !