मायाताईंच्या सान्निध्यात मिळे प्रेमाची सावली ।
२.४.२०२२ या दिवशी देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील वैद्या (सुश्री (कु.)) माया पाटील यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त स्फुरलेल्या काव्यपंक्ती येथे दिल्या आहेत.
मायाताईंची मायाच न्यारी, मायेतून ब्रह्माकडे नेई ।
प्रगल्भ बुद्धीने बारकावे जाणिती ।
साधकांना साधनेची योग्य दिशा देती ।। १ ।।
सढळ हस्ते करतसे ज्ञानाची उधळण ।
सान्निध्यात तिच्या मिळे प्रेमाची सावली ।
गुरुमाऊलीचा कृपावर्षाव होई, अशी ही रत्नांची खाण ।। २ ।।
– सौ. विद्या सुरेश जाखोटिया (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ६० वर्षे), पुणे (२.४.२०२२)