ताजमहालात पूजा करण्यासाठी गेलेले महंत परमहंस दास पोलिसांच्या कह्यात !
आगरा (उत्तरप्रदेश) – अयोध्या छावणीचे तपस्वी महंत परमहंस दास यांनी ताजमहालात भगवान शिवाची पूजा करण्याची घोषणा केली होती. महंत परमहंस दास त्यांच्या शिष्यांसह ताजमहालकडे जात असतांना पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले. सध्या त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. ‘ताजमहाल हा भगवान शिवाचा तेजोमहालय आहे. मला तेथे पूजा करायची आहे’, असे महंतांनी सांगितले.
Ayodhya seer stopped in Agra after he announced ‘shudhikaran’ of Taj Mahal https://t.co/uoTUg78bY9
— TOI Cities (@TOICitiesNews) May 3, 2022
यापूर्वी महंत परमहंस दास २६ एप्रिल २०२२ या दिवशी आगरा येथे गेले होते. तेव्हा त्यांना नियमाविरुद्ध प्रवेशबंदी करण्यात आली होती. भगवे कपडे आणि धर्मदंड यांमुळे ताजमहालात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप महंत परमहंस दास यांनी केला होता. तेथे उपस्थित असलेल्या विशिष्ट धर्माच्या लोकांच्या सांगण्यावरून सुरक्षादलाच्या सैनिकांनी माझ्याशी चुकीचे वर्तन केल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
संपादकीय भूमिकाताजमहाल ही हिंदूंची वास्तू आहे. याविषयीचे असंख्य पुरावे समोर आले आहेत. असे प्रकार रोखायचे असतील, तर अशा वास्तूंचे खरे स्वरूप समोर आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! |