बरेली (उत्तरप्रदेश) येथे लव्ह जिहाद्याकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार
बरेली (उत्तरप्रदेश) – येथील कासिम याने स्वतःचे ‘राहुल’ असे नाव सांगून एका अल्पवयीन हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि तिची अश्लील चित्रफीत बनवली. जेव्हा मुलीला कासिम मुसलमान असल्याचे समजले, तेव्हा ती त्याच्यापासून लांब राहू लागली. त्यामुळे कासिमने अनुमाने १२ सहकार्यांसह तिच्यावर आक्रमण केले आणि तिचे अपहरण करण्याचाही प्रयत्न केला. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला कारागृहात डांबण्यात आले आहे, असे बरेली पोलिसांनी ‘ट्वीट’ केले आहे.
UP: Another Grooming Jihad case in Bareilly, minor girl raped, blackmailed over obscene video by Kasim who claimed to be ‘Rahul’https://t.co/x01pS4agf5
— OpIndia.com (@OpIndia_com) April 29, 2022
थाना बारादरी पुलिस द्वारा प्रकरण के सम्बन्ध में अभियोग दर्ज कर आरोपित युवक को गिरफ्तार कर जेल भेजा जा चुका है। पंजीकृत अभियोग में विधिक कार्यवाही प्रचलित है।
— Bareilly Police (@bareillypolice) April 28, 2022
१. अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीनुसार कासिम हातात लाल धागा बांधत होता, तसेच कपाळावर लाल टीळा लावत होता. कासिम आणि पीडिता एकाच भागात रहातात.
२. आरोपीने पीडितेचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो ‘निकाह’ (लग्न) करण्यासाठी दबाव टाकत होता. त्यावेळी पीडितेने मोठ्याने आरडाओरड केली. त्यामुळे परिसरातील लोक गोळा झाले. त्यांनी कासिमला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिसांनी कासिमच्या विरोधात ‘पॉक्सो’, धर्मांतर आणि बलात्कार या कलमांखाली गुन्हे नोंदवले आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदु मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करणार्या जिहाद्यांना आजन्म कारावासात ठेवा ! |