शिवसेनेच्या भगव्याची साथ कदापि सोडणार नाही ! – रामदास कदम, शिवसेना
मुंबई – मी मरेपर्यंत भगव्याची साथ सोडणार नाही. पक्षाशी कधीही बेईमानी करणार नाही. अफवांमध्ये काहीही तथ्य नाही. मी स्वत:ला डाग कधीच लावून घेणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनेचा भगवा झेंडा मरेपर्यंत माझ्या खांद्यावर असेल. भगव्याची साथ कदापि सोडणार नाही, असे वक्तव्य शिवसेनेते ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी केले. २ मे या दिवशी रामदास कदम यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना रामदास कदम यांनी वरील वक्तव्य केले. काही मासांपूर्वी रामदास कदम हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते.