राणा दांपत्याच्या जामीन अर्जावर ४ मे या दिवशी सुनावणी !
मुंबई – राजद्रोहाच्या आरोपाखाली कारागृहात असलेले खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्या जामिनाच्या अर्जावर २ मे या दिवशी सुनावणी होऊ शकली नाही. मुंबई सत्र न्यायालयात त्यांच्या जामिनाच्या अर्जावर ४ मे या दिवशी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत राणा दांपत्याला कारागृहात रहावे लागणार आहे. राज्य सरकारने राणा दांपत्याच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे. ३० एप्रिल या दिवशी न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. नवनीत राणा या भायखळा, तर रवि राणा तळोजा कारागृहात आहेत.